लातूर: मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांशी जिल्हाधिकाऱ्यांनी साधला संवाद ! समस्या जाणून घेत दिला आधार
Latur, Latur | Oct 1, 2025 महसूल विभागाच्या वतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आर्वी येथील मातोश्री वृद्धाश्रमाला भेट देवून तेथील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांना आधार दिला.