तुमसर: शहरातील बालाजी बोरवेल गोडाऊन जवळ गांजा तस्करी करणारे दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात, ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
तुमसर शहरातील तुमसर खापा रस्त्यावरील बालाजी गोडाऊन जवळ तुमसर पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान दि. 14 सप्टेंबर रोज रविवारला सकाळी 9 वा. गांजा तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना अटक करून आरोपींच्या ताब्यातील 1 किलो 872 ग्रॅम गांजा व दुचाकी असा एकूण 98 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. स्वप्निल घोडीचोर व प्रशांत कांबळे असे अटकेतील आरोपींची नावे असून आरोपींवर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात तुमसर पोलिसांनी केली आहे.