कल्याण: उंबर्डे गावात फटाक्यामुळे एका दुकानात लागली भीषण आग
Kalyan, Thane | Oct 24, 2025 मागील काही दिवसांमध्ये फटाक्यांमुळे अनेक ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या होत्या. तशी जागेची घटना रात्री उशिराच्या सुमारास कल्याणच्या उंबर्डे गावात घडली. रस्त्यावर फटाके फोडत असताना फटाका उडून दुकानात गेला आणि दुकानांमध्ये असलेल्या साहित्याने पेट घेतली आणि काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. प्रसंगावधान राखल्यामुळे मोठी जीवित हानी टळली आहे, परंतु दुकान जळून खाक झाले आहे.