मानगाव: मत्स्योत्पादनात मुंबईसह रायगड, रत्नागिरीचा दबदबा
युद्ध परिस्थिती आणि हवामान बदलामुळे निर्माण झालेली विविध आव्हाने यावर मात करत भारताच्या सागरी उत्पादनांच्या निर्यातीने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 72,325.82 कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. मरीन प्रोडक्ट्स एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटीच्या आकडेवारीनुसार, देशाच्या या यशात महाराष्ट्राच्या, विशेषतः कोकण किनारपट्टीचा सिंहाचा वाटा आहे. राज्य मत्स्यव्यवसाय विभाग आणि सेंट्रल मरिन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट (सीएमएफआरआय) च्या अहवालानुसार, महाराष्ट्राच्या सागरी निर्यातीमुळे देशाच्या तिजोरीत तब्बल 7,343 कोटी 41 लाख रुपयांचे परकीय चलन जमा झाले आहे.