लातूर: लातूर काँग्रेस भवनात ‘आयर्न लेडी’ इंदिरा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त व ‘लोहपुरुष’ सरदार पटेलांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
Latur, Latur | Oct 31, 2025 लातूर – देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान आयर्न लेडी इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त काँग्रेस भवन, लातूर येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.खा. डॉ. शिवाजी काळगे व लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी बाळासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत इंदिरा गांधी व सरदार पटेल यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.