कराड: कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची मोठी कामगिरी; तीन जणांना अटक, पाच दुचाकीसह पावणे चार लाखांचा मुद्देमाल जप्त
Karad, Satara | Sep 25, 2025 कराड शहर पोलिसांनी अत्यंत शिताफीने तीन चोरट्यांना जेरबंद करण्यात यश मिळवले असून त्यांच्याकडून चोरीतील पाच दुचाकींसह तीन लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तिघेही चोरटे कराड शहरातील आहेत. कराड शहर पोलीस ठाण्यातून गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांनी शहर पोलिसांना वाढते गुन्हे रोखण्यासाठी कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.