नागपूर शहर: बेपत्ता झालेल्या पतीचा पत्ता लावून देण्याचे आमिष दाखवून भोंदू बाबा ने महिलेवर केला बलात्कार : प्रमोद पोरे वरिष्ठ पो. नि
सक्करदरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांनी 7 एप्रिल ला दुपारी 4 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार , मागील काही महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या पतीचा पत्ता लावून देण्याचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला भोंदू बाबाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची सविस्तर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांनी दिली आहे.