भंडारा: दोनदा मतदान केलं नाही; आशिष शेलार यांचे आरोप खोटे : मतदार अझहर अब्दुल शेख
साकोली विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांचे दुबार मतदान झाल्याचा गंभीर आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी ४७७ दुबार मतदान झाले असून अझहर अब्दुल शेख यांनीही दोनदा मतदान केल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र, या आरोपांवर प्रतिक्रिया देताना अझहर अब्दुल शेख यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी सांगितले की, “माझ्या नावावर दोन मतदान कार्ड असले तरी मी केवळ एकदाच मतदान केले आहे.