धामणगाव रेल्वे: तळेगाव दशासर येथे वृद्ध महिलेचा आढळला विहिरीत मृतदेह
तळेगाव दशासर येथे राहणार कमला निळकंठ बोडने व वर्ष 78 या वृद्ध महिलेचा मृतदेह विहिरीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे .कमला निळकंठ बोडणे या वृद्ध महिलेला मूलबाळ नसून त्या घरी एकटाच राहत होत्या. सदर महिलेचे नातेवाईक घरी आले असता त्यांना वृद्ध महिला दिसल्या नाही .शोधाशोध घेतला असता सदर वृद्ध महिलेच्या मृतदेह घरासमोर असलेल्या विहिरीत आढळून आला. घटनेची माहिती तळेगाव दशासर पोलिसांना देण्यात आली. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय येथे पाठविले.