कल्याण: फटाक्याची ठिणगी आली म्हणून जाब विचारणाऱ्या बाप लेकाला सुरक्षारक्षकाकडून बेदम मारहाण, सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर
Kalyan, Thane | Oct 22, 2025 कल्याण डोंबिवली परिसरामध्ये सुरक्षारक्षकांची दादागिरी वाढलेले पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसापूर्वी एका सुरक्षारक्षकाने बोलला म्हणून दोन मुलांना हात बांधून बेदम मारहाण केली होती, तर एका सुरक्षारक्षकाने अल्पवयीन मुली सोबत गैर कृत्य केले होते. या घटना ताज्या असतानाच कल्याण परिसरात पुन्हा एका एका वॉचमन ची दादागिरी पाहायला मिळाली. फटाके ची ठिणगी आल्यावर जाब विचारण्यासाठी केलेल्या बाप लेकांना वॉचमन ने बेदम मारहाण केली. घटनेचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून व्हायरल होत आहे.