रावेर: मोहराळा येथे घरात साचून ठेवलेल्या कापसाला आग, दोन क्विंटल कापूस जडून खाक, यावल पोलिसात अकस्मात आगी ची नोंद
Raver, Jalgaon | Oct 20, 2025 मोहराळा या गावातील रहिवासी शेतकरी भीमराव धर्मा शिरसाठ यांनी आपल्या घरात कापूस साचवून ठेवला होता. दरम्यान या कापसाला अचानक आग लागली. नागरिकांनी धाव घेऊन काही कापूस यातून वाचवला तर दोन क्विंटल कापूस जळून खाक झाला यात शेतकऱ्याचे १२ हजाराचे नुकसान झाले आहे. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.