अलिबाग: पोयनाड येथे भव्य रोजगार मेळावा; शेकडो तरुणांना मिळाली रोजगाराची संधी
Alibag, Raigad | Oct 13, 2025 शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजा केणी यांच्या पुढाकाराने आज पोयनाड येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याच्या माध्यमातून शेकडो बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. या रोजगार मेळाव्यात जवळपास चाळीसहून अधिक नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता, तर अडीच हजारांहून अधिक तरुणांनी उपस्थित राहून नोकरीसाठी संधी साधली. विशेष म्हणजे, ज्या उमेदवारांची निवड झाली त्यांना त्याच ठिकाणी नियुक्तीपत्र देण्यात आले, ही या मेळाव्याची विशेषता ठरली.