आरोग्यसेवा थेट नागरिकांपर्यंत… गोडलवाही येथे 101 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी!
गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने दि. 13 सप्टेंबर 2026 रोजी मौजा गोडलवाही येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
पोलीस रुग्णालय गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली आणि जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात 101 नागरिकांची तज्ज्ञ वैद्यकीय पथकाकडून तपासणी करून आवश्यकतेनुसार मोफत औषधे व आरोग्यविषयक मार्गदर्शन देण्यात आले.
यावेळी फिरत्या प्रदर्शनीच्या माध्यमातून शहीद जवानांचे बलिदान, C-60 जवानांचे शौर्य आणि गडचिरोली पोलीस दलाच्या नागरी कृती उपक्रमांची माहिती नागरिकांना देण्यात आली.
सन 2021 पासून गडचिरोली पोलीस दलाने 219 आरोग्य मेळाव्यांच्या माध्यमातून 50 हजारांहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी केली आहे.
सेवेतून विश्वास… आरोग्यातून सुरक्षिततेची साथ!
गडचिरोली पोलीस — सदैव आपल्या सोबत.
@mramesh_ips @dgpmaharashtra
#GadchiroliPolice #HealthCamp #Godalwahi #PoliceForPeople #CommunityPolicing HealthcareForAll
Gadchiroli, Maharashtra | Sep 13, 2026