अलिबाग: अखेरची घटका मोजतेय डोंगरची काळी मैना
Alibag, Raigad | May 29, 2026 खाडीपट्टयाचे हवामान करवंदाला मानवणारे. म्हणूनच इथे त्याची झुडपे मुबलक होती. पण आता क्वचितच एखादे झाड दिसते. “हे असेच सुरू राहिले तर 5 वर्षांत करवंद फक्त चित्रात उरेल. वन विभागाने, ग्रामपंचायतींनी तातडीने करवंद लागवड मोहीम हाती घ्यावी," अशी मागणी पर्यावरण अभ्यासक प्रा. नंदकुमार जाधव यांनी केली. गावरान आंबा, जांभूळ, आळू पाठोपाठ आता करवंदही गेलं तर 'रानमेवा' हा शब्दच शब्दकोशात जमा होईल. काळी मैना वाचवायची असेल तर वणवे रोखावे लागतील.