कल्याण: शहाड येथे फटाक्यामुळे दुकानात लागली भीषण आग, मात्र धाडसी तरुणांमुळे मोठा अनर्थ टळला
Kalyan, Thane | Oct 23, 2025 कल्याण जवळ असलेल्या शहाड मध्ये एका दुकानात फटाक्यामुळे आग लागल्याची घटना सायंकाळच्या सुमारास घडली होती. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता चार धाडसी तरुण पुढे सरसावले आणि ग्रील वर चढून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु एक तरुण जखमी झाला आहे. तरुणांनी धाडस दाखवून पुढाकार घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.