मोर्शी: काँग्रेस पक्षाच्या वतीने मोर्शी तहसील कार्यालयासमोर, काळी दिवाळी शिदोरी आंदोलन संपन्न
आज दिनांक 17 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता पासून काँग्रेस पक्षाच्यावतीने मोर्शी तहसील कार्यालयासमोर, काळी दिवाळी शिदोरी आंदोलन करून सरकारचा निषेध करण्यात आला. शेतकऱ्यांना जाहीर केलेले अतिवृष्टीचे पॅकेज अजून पर्यंत मिळाले नसल्याने, तहसीलदारांना निवेदन देऊन सरकारचा निषेध करण्यात आला. मोर्शी तालुका शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भूषण कोकाटे,धनंजय तट्टे, इंजिनियर मिलिंद कांबळे, प्रफुल्ल चिखले, रमेश काळे, श्याम भाऊ बेलसरे, संजय मंगळे, मोहन अढाउ, मोहन राजस, निलेश तट्टे, इत्यादी उपस्थित होते