नागपूर शहर: नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाला लाचेची कीड! महसूल सहाय्यक ५ लाखांच्या लाचेसह एसीबीच्या जाळ्यात
नागपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या महसूल सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे.तक्रारदाराच्या शिवाजीनगर, महाल, नागपूर येथील ११३५ चौरस फूट प्लॉटच्या बांधकामासंदर्भात अतिरिक्त जिल्हाधिकारी (स्लम) कार्यालयात एक अपील दाखल होते. हे प्रकरण तक्रारदाराच्या बाजूने निकाली काढण्यासाठी आरोपी लोकसेवक नरेश साधूरामजी बर्वे (वय ५४) यांनी ५ लाख रुपयांची मागणी केली होती. या मागणीनंतर तक्रारदाराने एसीबी, नागपूरकडे धाव घेतली होती.