नागपूर शहर: कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला प्रकरणी पोलीस निरीक्षक अतुल मोहनकर यांची प्रतिक्रिया
वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल मोहनकर यांनी 7 मे ला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करून त्यांना धमकी देण्यात आली होती या प्रकरणी अजनी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून याबद्दलची सविस्तर माहिती पोलीस निरीक्षक अतुल मोहन कर यांनी दिली आहे.