मोर्शी: मोर्शी पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातून अल्पवयीन मुलीला, फुस लावून नेले पळवून
मोशी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावातून एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला दिनांक 11 ऑक्टोंबर ला मध्यरात्रीचे दरम्यान कुण्यातरी अज्ञात इसमाने पळवून नेले असल्याची घटना उघडकीस आली असल्याने, मुलीच्या नातेवाईकांनी 11 ऑक्टोबरला रात्री दोन वाजून 26 मिनिटांनी अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरण तपासात घेतले आहे