ठाणे: कॅडबरी जंक्शन येथे वॉटर टँकर आणि टेम्पोचा विचित्र अपघात, एकाचा जागीच मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी
Thane, Thane | Sep 15, 2025 ठाणे शहराच्या कॅडबरी जंक्शन कडे नितीन कंपनीकडून येणाऱ्या पूर्व द्रुतगती महामार्गावर वॉटर टँकर ला पाठीमागून तीन चाकी टेम्पो ने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. माहिती मिळताच शहर वाहतूक पोलीस कर्मचारी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि टेम्पोमध्ये अडकलेल्या तिघांना बाहेर काढून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र बबलू नावाच्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले तर नाईक नावाची व्यक्ती आणि आलम शेख नावाच्या व्यक्ती गंभीर जखमी झाल्याने उपचार सुरू केले आहेत.