पनवेल: नवी मुंबई महानगरपालिकेचा मालमत्ताकर विभाग ॲक्शन मोडवर - थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटीस बजावणार
Panvel, Raigad | Nov 29, 2025 नवी मुंबई महानगरपालिका मालमत्ताकर विभागाकडून थकबाकीदारांविरुद्ध जप्तीपूर्व नोटीस बजावण्यास सुरुवात झाली आहे. एकूण थकबाकीदारांपैकी आतापर्यंत ६४५ नागरिकांना ७ दिवसांची जप्तीपूर्व नोटीस बजावण्यात आली आहे. तर २१८ नागरिकांना ४८ तासांची जप्तीपूर्व नोटीस बजावण्यात आली आहे. थकबाकीदारांनी तातडीने कर न भरल्यास पुढील टप्प्यात महानगरपालिकेकडून प्रत्यक्ष जप्ती कारवाईला सुरुवात करण्यात येणार आहे. मालमत्ताकर हा महानगरपालिकेच्या महसूलाचा सर्वात महत्वाचा स्त्रोत असून यातूनच नागरिकांना विविध सेवा सुविधांची पूर्तता केली जाते. त्यामुळे कर भरण्याबाबत सातत्य नसल्यास त्याचा शहरातील विकासकामांवर परिणाम होतो. असे आवाहन आज शनिवारी दुपारी ४ च्या सुमारास नवी मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांचेमार्फत करण्यात आलेले आहे.