महागाव: धावत्या चारचाकी वाहनाने अचानक घेतला पेट, गुंज ते माळकीन्ही मार्गावर खळबळ
महागाव तालुक्यातील गुंज ते माळकीन्ही या रस्त्यावर आज दि. ६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान धावत्या मालवाहू चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. रस्त्यावर अचानक आग लागलेले वाहन पाहताच परिसरातील नागरिक तसेच मार्गावरील वाहनचालकांमध्ये घबराट पसरली. काही काळासाठी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने ते निष्फळ ठरले. सदर वाहनाने पेट कसा घेतला याचे कारण समजले नाही.