जालना: पाणीप्रश्न आणि पथदिव्यांच्या मुद्द्यावर नगरसेवक अमोल ठाकूर सभागृहात आक्रमक*
Jalna, Jalna | Sep 11, 2026 जालना शहरातील पाणीपुरवठा आणि पथदिव्यांच्या प्रश्नावर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक अमोल ठाकूर यांनी आक्रमक भूमिका घेत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “महानगरपालिका शहरातील नागरिकांना किती दिवसांनी पाणीपुरवठा करते? सात दिवसांनी, दहा दिवसांनी की पंधरा दिवसांनी?” असा थेट सवाल नगरसेवक अमोल ठाकूर यांनी पाणीपुरवठा अभियंता बगळे यांना केला. नागरिकांकडून फोन क