तळा: तळेतील डम्पिंग ग्राउंड प्रदूषणाच्या विळख्यात
Tala, Raigad | May 24, 2026 तळा शहरातील डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबितच राहिल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील वाढत्या कचऱ्याच्या समस्येमुळे सध्याचे डम्पिंग ग्राउंड प्रदूषणाच्या विळख्यात सापडले असून, त्याचे स्थलांतर नेमके कोणत्या कारणामुळे रखडले आहे, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तळा नगरपंचायती कडून शहरातील ओला व सुका कचरा एकत्रितपणे तळा धरणा जवळील डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकण्यात येतो.