फुलंब्री: जळगाव महामार्गावरील पाथरी येथे संभाजी ब्रिगेडचे रास्ता रोको आंदोलन
फुलंब्री तालुक्यातील उपोषण करणारे मंगेश साबळे यांना समर्थन देऊन पाथरी येथे जळगाव महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून उपोषण करणारे साबळे यांच्या मागण्या मान्य कराव्या यासाठी सुमारे अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केले.