भोकरदन: मुख्य मार्गा लगतच्या विहिरींवर सुरक्षा बसवा, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र लोखंडे यांची पारध येथे मागणी
आज दिनांक 9 ऑगस्ट 2026 वार रविवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते रवींद्र लोखंडे यांनी भोकरदन ता.पारध येथे प्रशासनाकडे मागणी केली आहे की, मार्गाच्या जवळपासच्या ज्या विहिरी आहे,त्यांना प्रशासनाने सुरक्षा कठडे बांधावे यामुळे अपघात होऊन कितीकांना जीव करणारा लागत आहे अशीच घटना काल दि.8 ऑगस्ट रोजी पारध ते वालसावंगी मार्गावर कार विहिरीत कोसळून सासू सुनेचा मृत्यू झाला, या घटना थांबण्यासाठी प्रशासन व आरोग्य विभागाने योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.