नागपूर शहर: गंगा जमुना येथून अल्पवयीन मुलीची करण्यात आली सुरक्षित सुटका : राहुल मदने पोलीस उपायुक्त
पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी 28 नोव्हेंबरला 10 वाजता वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार गंगा जमुना येथे लकडगंज पोलिसांनी छापा मार कार्यवाही करून एका अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे. याप्रकरणी चार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एका महिलेला व एका पुरुषाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली आहे