जळगावच्या जामनेर येथील पाच दिवसांपासून बेपत्ता असलेला २७ वर्षीय तरुण निलेश राजेंद्र कासार याचा मृतदेह रामदेववाडी परिसरातील जंगलातील तलावात पोत्यात बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जुन्या किरकोळ वादातून दोन मित्रांनीच निलेशची हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलीस तापासात समोर आली आहे. या संदर्भातली माहिती आज दिनांक 19 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी याबाबत अधिक माहिती दिली.