नागपूर शहर: नागपुरात लाखोंचा गांजा जप्त; तहसील पोलिसांची मोठी कारवाई: संजय मेंढे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
तहसील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी 13 एप्रिलला सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूरच्या तहसील पोलीस स्टेशन अंतर्गत 'तकिया काला झेंडा' परिसरात पोलिसांनी छापा टाकून तब्बल ५७.४७० किलो गांजा जप्त केला आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून जप्त केलेल्या गांजाची बाजारपेठ किंमत १४,३६,७५० रुपये इतकी आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिली आहे.