नागपूर शहर: पारडी पोलिसांची मोठी कारवाई: वाहन चोरीच्या टोळीचा पर्दाफाश; ५ महागड्या मोटारसायकली जप्त : नंदा मनगटे वरिष्ठ पोलीस निरीक्
पारडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांनी 12 जूनला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार,पारडी पोलिसांनी वाहन चोरीच्या एका गंभीर प्रकरणाचा छडा लावला असून, दोन जणांना अटक केली आहे. यामध्ये यशोधरा नगर येथील रहिवासी मोहम्मद जसीम अली हुसैन आणि त्याच्या एका नाबालिग साथीदाराचा समावेश आहे. हे आरोपी पारडीसह विविध ग्रामीण भागात दुचाकी चोरीच्या घटनांना अंजाम देत होते.याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांनी दिली आहे.