पनवेल: सातबारा नोंदीसाठी ३० हजारांची लाच घेणाऱ्या मंडळ अधिकाऱ्याला २५ मेपर्यंत पोलीस कोठडी
Panvel, Raigad | May 21, 2026 सातबारा उताऱ्यावर नाव नोंद मंजूर करून देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पनवेल तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी गोवर्धन नाना माने याला अटक करण्यात आली होती. त्याला बुधवारी (दि.२०) पनवेल न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला २५ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणामुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.