उल्हासनगर: सुभाष टेकडी परिसरातील महात्मा फुले कॉलनीत खाजगी बसचा अपघात, कोणतीही जीवितहानी नाही
उल्हासनगरमधील सुभाष टेकडी परिसरातील महात्मा फुले कॉलनीत शुक्रवारी सकाळी खाजगी बसचा अपघात झाल्याची घटना घडली. रस्त्यावरील उतरणीवरून बस घसरून बाजूच्या वाहनांना घासून दुकानाला धडकली. अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. दरम्यान घटनास्थळी दाखल होत विठ्ठवलवाडी पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले आहे.