सेलू: राजा येथे दारू पिण्यासाठी पाणी न दिल्याने एकास मारहाण ;दोन जणावर गुन्हा दाखल
Sailu, Parbhani | Jan 28, 2024 सेलू तालुक्यातील राजा येथे 19 जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता ग्रामपंचायत कार्यालयाच्या ओट्यावर बसलेल्या दोन जणांनी पाणी भरण्यासाठी आलेल्या एका जणास दारू पिण्यासाठी पाणी आणून दे म्हणून मागणी केली तेव्हा उभयता भांडणे झाली. या प्रकरणी 26 जानेवारी रोजी दोन जणावर सेलु पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस पुढील तपास करत आहे.