एरंडोल: एरंडोल येथील पोलिस हवालदाराला लाच घेताना धुळे एसीबी पथकाने पकडले,एरंडोल पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
एरंडोल येथील पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार बापू लोटन पाटील हे अपघाताच्या एका गुन्ह्यात मदत करण्यासाठी एकांकडून तीन हजाराची लाच मागत होते. समाधी दाने धुळे एसीबी कडे याबाबत तक्रार केली. तेव्हा त्यांनी एरंडोल चौफुली जवळ सापळा रचला आणि लाच स्वीकारताना पाटील यांना रंगेहात पकडण्यात आले. एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.