ठाणे: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबईत वनमंत्र्यांच्या उपस्थितीत एकता दौड,उत्स्फूर्त प्रतिसाद
Thane, Thane | Oct 31, 2025 आज 31 ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची 150 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी राष्ट्रीय एकता दौडच्या आयोजन केले जात आहे. नवी मुंबईमध्ये देखील वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीमध्ये एकता दौड संपन्न झाली. वनमंत्री गणेश नाईक यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. या एकता दौडमध्ये नवी मुंबईकर विद्यार्थी,नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपस्थित सर्वांना वनमंत्री गणेश नाईक यांनी शुभेच्छा दिल्या.