नागपूर शहर: नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह इतर ठिकाणी 'रेडिओअॅक्टिव्ह पावडर' टाकण्याची धमकी; बघा काय म्हणाले मंत्री पंकज भोयर
नागपुरात पोलीस आयुक्त यांच्या नावे आलेल्या निनावी पत्राद्वारे शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह इतर ठिकाणी रेडिओअॅक्टिव्ह पावडर टाकण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता प्रशासनाने तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सध्या सर्व यंत्रणा या पत्राच्या स्त्रोताचा आणि त्यातील तथ्यांचा शोध घेत असून नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.