नागपूर शहर: वाहन चोरी करणारा आरोपी अटकेत, चोरीची ॲक्टिवा हस्तगत: अमित देशमुख पोलीस उपनिरीक्षक
गुन्हेगार शाखा युनिट 3 चे पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख यांनी 29 जूनला दुपारी चार वाजून तीस मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने वाहन चोरीच्या एका प्रकरणाचा छडा लावत गुंजन उर्फ चिंटू विश्वजीत खोमने (वय २८) या आरोपीला अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने तहसील पोलीस स्टेशन हद्दीतून एक ॲक्टिवा मोपेड चोरली होती. याप्रकरणी गुन्हे शाखेने तांत्रिक तपास करून आरोपीला जेरबंद केले. पोलिसांनी आरोपीकडून २५,००० रुपये किमतीची चोरी केलेली ॲक्टिवा जप्त केली आह