सेनगाव: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जिल्ह्यावर शिवसेनेचा भगवा फडकवू,माजी आमदार गोरेगावकर
हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगांवकर यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भरघोस यश संपादन करून हिंगोली जिल्ह्यावर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवणार असल्याचे आज सांगितले. माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या निवासस्थानी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला नुकतेच काँग्रेस सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी आमदार संतोष बांगर व मी आगामी निवडणुकीमध्ये शिवसेनेचा भगवा जिल्ह्यावर फडकवणार असल्याचे सांगितले.