अहिल्यानगर महानगरपालिकेने शहरातील पुरातन व ऐतिहासिक महत्व असलेली माळीवाडा वेस हटविण्याबाबत नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागविल्या आहेत. परंतु महापालिकेच्या या जाहीर प्रसिद्धीनंतर शहरात नागरिकांकडून तीव्र संताप महापालिकेच्या विरोधात व्यक्त करण्यात येत आहे. तर शहरातील पैलवान प्रतिष्ठाने शहरातील अनधिकृत अतिक्रमणे आणि रस्त्याच्यामध्ये असलेले थडगे, जुने बांधकामे पाहिले काढा, त्यानंतर माळीवाडा वेशीबाबत बोला, असा महापालिकेला इशारा दिला आहे