नागपूर शहर: नागपुरात वाहतूक पोलिसावर जीवघेणा हल्ला; बघा वायरल होत असलेले सीसीटीव्ही फुटेज
नागपूर शहरात गुन्ह्याचा ग्राफ वाढत असून एक धक्कादायक घटना समोर आली आहे mनागपूरच्या मानकापूर परिसरात वाहतूक पोलिसावर ७ ते ८ दुचाकीस्वारांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रोड रेजच्या कारणावरून २८ जून रोजी रात्री घरी परतत असताना, दुचाकीस्वारांनी पोलिसाच्या कारचा पाठलाग करून, त्यांना अडवून कारची तोडफोड केली आणि बेदम मारहाण केली.