मोर्शी: खोलवाटपूरा येथील माळूनदीत वाहून गेलेल्या युवकाचा, सालबर्डी येथील नदीपात्रात मिळाला मृतदेह
खोलवाट पुरा येथील माळु नदीत वाहून गेलेल्या कुणाल किशोर बागडे वय 18 वर्षे या युवकाचा दिनांक 23 सप्टेंबरला दुपारी बारा वाजता चे दरम्यान सालबर्डी जवळील नदीपात्रात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. दिनांक 13 सप्टेंबर रोजी कुणाल माळु नदी पात्रात वाहून गेल्याने नदीपात्रात त्याचा शोध घेण्यात आला होता. मात्र तो आढळून आला नसल्याने तब्बल दहा दिवसानंतर कुलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. मोर्शी पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणी करिता मुलताईयेथे पाठवण्यात आला