नागपूर शहर: नागपुरात 'आपली बस'ला टिप्परची धडक; वाहक गंभीर जखमी, चालकही जखमी, थोडक्यात वाचले प्रवासी
खापरी डेपोची 'ईका' इलेक्ट्रिक बस आज सकाळी ७:०० वाजताच्या सुमारास अपघाताची बळी ठरली. खापरी डेपोतून आपली बस टर्मिनलकडे जात असताना, पंचशील चौक येथे एका अज्ञात टिपपरने बसला उजव्या बाजूने जोरात धडक दिली आणि चालक घटनास्थळावरून पसार झाला. बस वाहक **सपना मोटघरे** या भीषण अपघातात गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालक **तन्वीर अहमद** यांनाही दुखापत झाली आहे. सुदैवाने, बसमध्ये असलेल्या ४ प्रवाशांना कोणतीही इजा झालेली नाही.