नागपूर शहर: गणेशपेठ हद्दीत बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू
एकोणवीस मे ला रात्री आठ वाजता मिळालेल्या माहितीनुसार गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घाट रोडवरील जैन डेअरीसमोर एक अंदाजे ४५ ते ५५ वर्षे वयाची अनोळखी महिला बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. तिला उपचारासाठी मेयो हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. याप्रकरणी प्राप्त सूचनेवरून पोलीस स्टेशन गणेश पेठ येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.