औंढा नागनाथ: गोळेगाव कृषी महाविद्यालयाजवळ कारच्या धडकेत २ ठार, कारचालकावर औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
औंढा नागनाथ ते जिंतूर जाणाऱ्या मार्गावर गोळेगाव कृषी महाविद्यालय जवळ भरधाव कारणे दोन दुचाकीला धडक दिल्याने दोन जण ठार झाल्याची घटना घडली होती. यामध्ये रोहित राठोड व अन्य एकाचा मृत्यू झाला होता या प्रकरणी फिर्यादी अर्जुन राठोड यांच्या फिर्यादीवरून कार क्रमांक एम एच 43 डी 6766 चा चालक ज्याचे नाव गाव माहित नाही याच्यावर दिनांक चार नोव्हेंबर मंगळवार रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.