बागलाण: बागलाणच्या ताहाराबाद - आंतापुर रस्त्यावर मोटारसायकलच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू
Baglan, Nashik | Oct 4, 2025 बागलाणच्या ताहाराबाद - आंतापुर रस्त्यावर मोटारसायकलच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू बागलाणच्या ताहाराबाद - आंतापुर रस्त्यावरील वाकीनाला जवळ झालेल्या भीषण अपघातात आंतापुर येथिल युवकाचा दुर्दैवाने जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे हा अपघात काल दिनांक 3 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री ११ ते १२ वाजेच्या दरम्यान घडला आहे. या घटनेने परिसरात चांगलीच हळहळ व्यक्त होत आहे. आंतापुर येथिल तरुण यज्ञेश खैरनार हा ताहाराबाद येथून आपले काम आटपून आपल्या मोटारसायकल वरून येत असताना हा अपघात झाला.