पनवेल: उलवेतील हायटेक कॅस्टल सोसायटीत भीषण आग
Panvel, Raigad | May 12, 2026 उलवे नोड सेक्टर 17 येथील हायटेक कॅस्टल या तेरा मजली इमारतीच्या मीटर रूममध्ये शनिवारी दुपारी अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दुपारी साडेतीन वाजता उलवे अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. मीटर रूममधून लागलेल्या आगीने संपूर्ण इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये वेगाने फैलाव घेतल्याने इमारतीत मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. अग्निशमन दलाने प्रथम विद्युत पुरवठा बंद करून बीए सेट परिधान करत बचावकार्य सुरू केले. फायर इंजिनच्या होज रीलच्या साहाय्याने आगीवर पाण्याचा मारा करण्यात आला.