नागपूर शहर: महाराष्ट्रभर आंदोलन पेटणार! उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी नागपुरात 'लहुजी सेने'चा एल्गार
राज्यात आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा आता अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत. उपवर्गीकरण लागू करण्याच्या मागणीसाठी आज नागपूरच्या ऐतिहासिक संविधान चौकात लहुजी सेनेच्या पुढाकाराने तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला की, जर महाराष्ट्रात लवकरच उपवर्गीकरण लागू झाले नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन पेटवण्यात येईल.