नागपूर शहर: हुडकेश्वर पोलिसांची धडक कारवाई: गांजासह दोघांना अटक: अनामिका मिर्झापुरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापूर यांनी 23 जूनला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार,नागपूर: हुडकेश्वर पोलिसांनी 'ऑपरेशन थंडर' अंतर्गत त छापा टाकून मादक पदार्थांच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत शेख शाहरुख आणि शेख इसराइल या दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून २ किलो ९२९ ग्रॅम गांजा आणि तस्करीसाठी वापरलेली स्विफ्ट डिझायर कार जप्त करण्यात आली आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापूर यांनी दिली आहे.