मानगाव: रायगडमध्ये पाच सरपंचांसह 30 सदस्यपदांसाठी पोटनिवडणुकीसाठी होणार मतदान
Mangaon, Raigad | Apr 28, 2026 रायगड जिल्हयातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी येत्या 28 एप्रिल रोजी मतदान होत आहे. 7 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाले. त्यानंतर अर्ज छाननी, माघारीनंतर निवडणूक लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. 14 ग्रामपंचायतींवरील सरपंच बिनविरोध झाले आहेत तर 55 सदस्यांची ही बिनविरोध झाली आहे. आता पाच सरपंच आणि 30 सदस्य पदांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींमध्ये राजकीय पक्षांची जोरदार तयारी केलेली दिसते.