जळकापट येथे सुरू असलेल्या बैलगाडा शर्यतीच्या तिसऱ्या दिवशी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. तालुक्यासह परिसरातील अनेक गावांतून नागरिक मोठ्या उत्साहाने शंकरपट पाहण्यासाठी जळकापट येथे दाखल झाले होते. तसेच महाराष्ट्रातील विविध भागांतून अनेक पटशौकिनांनी आपल्या बैलजोड्या येथे आणून शर्यतीत सहभाग नोंदवला. या शंकरपट स्पर्धेसाठी आयोजकांकडून उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. शिस्तबद्ध व्यवस्थापन, सुरक्षिततेची काळजी आणि स्पर्धेचे सुंदर आयोजन यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. खासदार काळे